लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : तापाच्या आजाराने जिल्हा फणफणला असून उपचारासाठी ग्रामीण भागातील रूग्ण येथील कारंजा ग्रामीण रूग्णालयात गर्दी करीत आहे. डेंग्युचे रूग्णही तालुक्यातील ग्राम काजळेश्वर व ईतरही गावात रूग्ण असल्याने ग्राम पंचायत व आरोग्य प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. पावसाळयात नागरीकांना विविध साथीचे आजार होतात. या आजारावर नियत्रंण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे. तसेच ग्राम पंचायत काजळेश्वर येथील वार्ड क्रमाक ३ मधील मुख्य पाणी पुरवठा करणारी वाहीणी त्याच प्रमाण तांडा वस्तीत जाणारी पाईपलाईन फुटून सुध्दा दुरूस्त करण्यात आली नाही. परीणामी जलवाहीणी मार्फत दूषीत पाण्याचा पुरवठा गावकºयांना होत आहे. या कडे प्रशासनाने व आरोग्य यंत्रणेने लक्ष द्यावे अशी मागणी नितीन उपाध्ये यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कारंजा तालुका तापाने फणफणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 8:14 PM
कारंजा : तापाच्या आजाराने जिल्हा फणफणला असून उपचारासाठी ग्रामीण भागातील रूग्ण येथील कारंजा ग्रामीण रूग्णालयात गर्दी करीत आहे. डेंग्युचे रूग्णही तालुक्यातील ग्राम काजळेश्वर व ईतरही गावात रूग्ण असल्याने ग्राम पंचायत व आरोग्य प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
ठळक मुद्देग्रामीण रूग्णालयात गर्दी ग्राम पंचायत व आरोग्य प्रशासनाने लक्ष द्यावे - मागणी