रिसोड (वाशिम): नापिकी आणि डोक्यावरील कर्ज फेडण्याची चिंता यामुळे नैराश्य आलेल्या एका शेतक-याने शेतातच फाशी घेऊन आत्महत्या केली. विलास जयवंतराव प-हाड (४०) असे मृतक शेतक-याचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. मृतक प-हाड यांच्या कुटूंबाकडे १५ एकर शेती होती. या शेतीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे २ लाख रुपये कर्ज असल्याची माहिती कुटूंबियांनी दिली. ते २४ आॅगस्टला सायंकाळी सात वाजता घरातून निघून गेले होते. २६ आॅगस्ट रोजी त्यांच्या शेतातच लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेला मृतदेह आढळला.
वाशिममध्ये शेतक-याची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 8:20 PM