रिसोड - रब्बी हंगामात गारपिटीने रिसोड तालुक्यातील शेतकºयांचे अतोनात झाले होते. शासनाकडून गारपिटग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची रक्कमही प्राप्त झाली. मात्र, अद्यापही तालुक्यातील मांगूळ झनक परिसरातील पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.फेब्रुवारी महिन्यात गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. शासनाकडून नुकसानभरपाईची रक्कम मिळाल्याने सदर रक्कम शेतकºयांच्या बचत खात्यात जमा होणे अपेक्षीत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मांगूळझनक शाखेंतर्गत येणाºया अनेक शेतकºयांच्या बचत खात्यात अद्याप नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली नाही. खरिप हंगाम सुरू असल्याने बी,बियाणे व खते खरेदीसाठी शेतकºयांना पैशांची नितांत गरज आहे. असे असतानाही अनेक शेतकºयांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नसल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडली. काही शेतकºयांच्या कर्जखात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आल्याने सदर रक्कम काढता येत नाही. त्यामुळे या रकमेचाही शेतकºयांना फायदा होत नसल्याचे दिसून येते. शासन तसेच जिल्हा प्रशासनाचे निर्देश असतानाही शेतकºयांच्या कर्जखात्यात सदर रक्कम जमा कशी करण्यात आली, याची चौकशी करण्यात यावी तसेच शेतकºयांवर अन्याय करणाºयांविरूद्ध योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे यांनी तहसिलदारांकडे २१ जून रोजी निवेदनाद्वारे केली. रिसोड तहसिल प्रशासनाने शेतकºयांच्या अचूक बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याबाबत बँक शाखेला लेखी पत्रही दिले आहे. मात्र, रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. बँक व तहसिल प्रशासनाने शेतकºयांच्या व्यथा जाणून सदर रक्कम तातडीने पात्र शेतकºयांच्या बचत खात्यात जमा करावी, २५ जूनपर्यंत सकाळी ११ वाजेपर्यंत न्याय न मिळाल्यास २५ जून रोजी मांगूळ झनक येथील बँक शाखेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महादेव ठाकरे यांच्यासह शेतकºयांनी दिला.
गारपिटीच्या नुकसानभरपाईपासून शेतकरी वंचित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 3:14 PM
रिसोड - रब्बी हंगामात गारपिटीने रिसोड तालुक्यातील शेतकºयांचे अतोनात झाले होते. शासनाकडून गारपिटग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची रक्कमही प्राप्त झाली. मात्र, अद्यापही तालुक्यातील मांगूळ झनक परिसरातील पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देफेब्रुवारी महिन्यात गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते.शासनाकडून नुकसानभरपाईची रक्कम मिळाल्याने सदर रक्कम शेतकºयांच्या बचत खात्यात जमा होणे अपेक्षीत होते. सहकारी बँकेच्या मांगूळझनक शाखेंतर्गत येणाºया अनेक शेतकºयांच्या बचत खात्यात अद्याप नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली नाही.