मंगरुळपीर : वांग्याच्या पिकांवर किड आल्याने तालुक्यातील चिखलागड येथील महिला शेतकरी सुशीला पवार यांचे शेतातील दोन एकर क्षेत्रावरील वांग्याच्या पिकावर दिनांक३१ आॅगस्ट रोजी ट्रॅक्टर फिरवून वांग्याची झाडे काढून टाकण्यात आली आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कपाशी,उडीद,मुंग ही पारंपरिक नियमित पिके शेतकरी घेत असतात.परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी अल्प पाऊस तर कधी अतिवृष्टी,पिकांवर होणारा विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतक?्यांच्या पिकांचे नुकसान होते.त्यामुळे अनेक शेतकरी खरिपातील नियमित पिकांसह शेतीच्या काही क्षेत्रावर फळे,भाजीपाला ही पिके घेतात.अशाच प्रकारे चिखलागड येथील सौ सुशीला पवार यांनी दोन एकर जागेवर वांग्याची लागवड केली होती.तसेच सदर पिकाची काळजी घेण्यासाठी व देखभाल करण्यासाठी गावातीलच प्रल्हाद भिका राठोड यांना सदर पिकासाठी बटाईदार ठेवले.परंतु लागवडीपासून या पिकावर अनेक प्रकारच्या फवारण्या,कीटकनाशके यावर खर्च करूनही किडीचा प्रादुर्भाव झाल्याने वांगे पिकाचे नुकसान थांबत नव्हते.त्यामुळे उद्विग्न होऊन पवार यांनी दोन एकर जागेवरील सदर वांग्याच्या पिकावर ट्रॅक्टर चालवून हे पीक उध्वस्त करून टाकले.यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. याबाबत बटआईदार शेतकरी प्रल्हाद राठोड यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना लेखी निवेदन देऊन नुकसान भरपाई मिळावी याकरिता मागणी केली आहे. याबाबत कृषीसेवक गोटे यांच्याशी संपर्क साधला असता नियमानुसार काही होत असेल तर सदर शेतक?्यास शासनाकडून मदत करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर वरून विशेष प्रयत्न करणार असल्याचे म्हटले.
शेतकऱ्याने दोन एकरातील वांग्याच्या पिकावर फिरविला ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 5:50 PM