लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु.: सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे हताश झालेल्या अल्पभूधारक वृद्ध शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथे सकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. रामकृष्ण विठोबाजी हुमने (६८), असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.धोत्रा देशमुख येथील अल्पभूधारक शेतकरी रामकृष्ण हुमने यांच्याकडे अवघी ३ एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. या शेतीसाठी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धनज बु. शाखेचे ६० हजार रुपये कर्ज घेतले होते, तर उसनवारीचे २० हजार रुपये मिळून त्यांच्यावर एकूण ८० हजार रुपयांचे कर्ज होते. शेतात सतत नापिकी होत असल्याने हे कर्ज फेडणे त्यांना अशक्य झाले होते. कर्ज फेडायचे कसे आणि कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा ही चिंता त्यांना सतावत होती. याच चिंतेतून त्यांनी राहत्या घरासमोरील सुबाभळीच्या झाडाळा गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद त्यांचा मुलगा चंद्रमणी रामकृष्ण हुमने यांनी धनज बु. पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरण तपासात घेतले आहे.
कर्जबाजारीपणामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 5:27 PM