या प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी भूमिका पार पाडली. तांत्रिक सत्रात राजेश डवरे यांनी आपले तांत्रिक हळद पिकावरील कंदमाशी, खोड किडा, हुमनी पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळी, पिकावरील सूत्रकृमी आदि किडींची ओळख, जीवनचक्र, नुकसानीचा प्रकार यावर प्रकाश टाकला, तसेच हळद पिकावरील कंदकुज व करपा आदि रोगाच्या संदर्भातील रोगाच्या प्रादूर्भावाची कारणे लक्षणे व उपाय योजना याविषयी विस्तृत विवेचन करून शेतकरी बंधूंनी हळद पीक संरक्षणासाठी कृषी विद्यापीठे व संशोधन संस्था यांनी शिफारशीत केलेल्या उपाययोजनेचा अंगीकार करावा, असा सल्लाही दिला, तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंका व प्रश्नाचे निराकरण केले. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील शेतकरी बंधूंच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगणक तज्ज्ञ श्रीकृष्ण बावस्कर यांनी केले.
हळद पीक संरक्षण तंत्रज्ञान विषयावर शेतकरी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:37 AM