लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गतवर्षीच्या हंगामात महाबीजसाठी हरभरा बिजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समित्यांतील दरामुळे नुकसान सहन करावे लागले. त्यांना झालेल्या नुकसानापोटी महाबीजने फरकाची रक्कम मंजुर केली आहे. महाजिबच्या जिल्हा व्यवस्थापकांनी या संदर्भातील ८५ लाख ५३ हजार रुपयांच्या मागणीचा प्रस्तावही विभागीय स्तरावर पाठविला आहे. तथापि, ५६३ शेतकºयांना अद्याप फरकाची रक्कम मिळाली नाही.गतवर्षीच्या हंगामात शेतकºयांनी सन २०१८-१९ मध्ये महाबीजच्या हरभरा बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत हरभºयाची पेरणी केली होती. या हरभºयाच्या काढणीनंतर महाबीजने संबंधित सर्व शेतकºयांकडून हरभरा बियाणे खरेदीसाठी नमुने संकलित करून त्याची प्रयोगशाळेत उगवण क्षमता तपासली. यात प्रमाणित आणि पायाभूत या दोन्ही प्रकारच्या बियाण्यांचा समावेश होता. या प्रक्रियेत ५६३ शेतकºयांच्या हरभरा बियाण्यांचे नमुने पास झाल्याने महाबीजने त्यांच्याकडून १८ हजार २४५ क्विंटल बियाणे मोजून खरेदी केले. या शेतकºयांना महाबीजच्या निकषानुसार अग्रीम रक्कम देण्यात आली, तर बियाण्यांचे अंतीम दर निश्चित करण्यासाठी नियमानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांतर्गत १ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यानचे उच्च दर तपासण्यात आले.तथापि, बाजार समित्यांत शासनाच्या हमीदरापेक्षा खूप कमी दराने हरभरा खरेदी झाली. त्यामुळे महाबीजची २५ टक्के आगाऊ रक्कम मिळूनही शेतकºयांना हमीदरापेक्षाही खूप कमी मोबदला मिळाला. महाबीजच्या निकषानुसार शेतकºयांना बियाणे विक्रीत प्रति क्विंटल ४६९ रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे शासन निर्णयानुसार या शेतकºयांना ही फरकाची रक्कम मिळणे अपेक्षीत होते. या संदर्भातील प्रस्ताव बियाणे महामंडळ पुणे आणि महाबीजच्यावतीने शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत हरभरा उत्पादकांच्या नुकसानापोटी फरकाची रक्कम देण्यास शासनाने दोन महिन्यांपूर्वी मंजुरीही दिली. या निर्णयानुसार महाबीजच्या वाशिम येथील जिल्हा व्यवस्थापकांनी मागणीचा प्रस्ताव तयार करून महाबीजच्या अकोला येथील विभागीय व्यवस्थापकांकडे १९ डिसेंबर रोजीच पाठविला; परंतु आता दोन महिने उलटले तरी हरभरा बिजोत्पादकांना फरकाची रक्कम मिळालेली नाही. दरम्यान, या ५६३ शेतकºयांशिवाय करडईचे बिजोत्पादन करणाºया एका शेतकºयालाही फरकाची रक्कम मिळालेली नाही.
महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत हरभरा बिजोत्पादकांना नुकसानापोटी प्रति क्विंटल ४६९ प्रमाणे फरकाची रक्कम देण्यासाठी एकूण ८५ लाख ५३ हजार रुपयांचा प्रस्ताव विभागीयस्तरावर पाठविला आहे. तांत्रिक अडचणींमुळे अद्याप शेतकºयांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकली नाही.- डॉ. प्रशांत घावडेजिल्हा व्यवस्थापक, महाबीज