वाशिम : खरीप हंगामात बी-बियाणे, खते खरेदी करताना वजनमापात फसवणूक होत असल्याने याप्रकरणी फसवणूक करणाºया सर्वांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांच्यासह शेतकºयांनी २० जून रोजी केली. खते व बियाणे खरेदी करताना संबंधित बॅगचे वजन कमी भरत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी सुरूवातीपासूनच केल्या होत्या. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समितीच्या सभेतही जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी, हेमेंद्र ठाकरे, उस्मान गारवे आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. या पृष्ठभूमीवर कृषी सेवा केंद्रांतून बियाणे व खते वजमकाटा करून मोजून द्यावी, असे निर्देश कृषी विभागाने दिले होते. तथापि, कृषी विभागाचे निर्देश धाब्यावर बसवून शेतकºयांना बियाणे व खते मोजून दिली जात नाहीत. ही बाब ‘लोकमत’ने १८ जून रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्येही उघडकीस आली होती. मागणी करूनही बियाण्यांच्या बॅग मोजून न देण्यामागे मोठे ‘अर्थ’कारण दडल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. दरम्यान, १९ जून रोजी १९ जून रोजी मालेगाव तालुक्यातील एकांबा येथील शेतकरी गजानन गवळी यांनी खरेदी केलेल्या महाबिजच्या बियाणे बॅगचे वजन केले असता, ते एक किलोपेक्षा अधिक प्रमाणात कमी भरले. तसेच एका बॅगमधील बियाणे बोगस असल्याची शंका आल्याने संबंधितांनी हा प्रकार कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यावरून कृषी विभागाच्या चमूनेतपासणी केली असता, बियाण्यांच्या काही बॅगचे वजन निर्धारित वजनापेक्षा कमी आढळून आले. याप्रकरणी कारवाईही प्रस्तावित केली. वाशिम जिल्ह्यात महाबिजचे जवळपास ५० हजार क्विंटलच्या आसपास बियाणे विक्रीसाठी असून, काही बियाणे बॅगचे वजन निर्धारित वजनापेक्षा कमी भरत असल्याने सर्व बॅगचे वजन करूनच शेतकºयांना विक्री करावी, वजनमापात फसवणूक करून शेतकºयांची लूट करणाºयांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी गवळी यांच्यासह शेतकºयांनी केली.
बियाण्यांच्या वजनमापातील घोळप्रकरणी शेतकरी आक्रमक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 6:59 PM
वाशिम : खरीप हंगामात बी-बियाणे, खते खरेदी करताना वजनमापात फसवणूक होत असल्याने याप्रकरणी फसवणूक करणाºया सर्वांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांच्यासह शेतकºयांनी २० जून रोजी केली.
ठळक मुद्देखते व बियाणे खरेदी करताना संबंधित बॅगचे वजन कमी भरत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी सुरूवातीपासूनच केल्या होत्या.वजनमापात फसवणूक करून शेतकºयांची लूट करणाºयांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी गवळी यांच्यासह शेतकºयांनी केली.