लोकमत न्युज नेटवर्क पांगरी नवघरे (वाशिम) : सतत वीजेच्या लपंडावामुळे रब्बी पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे परिसरातील बोरगाव वीज उपकेंद्रांतर्गत हा प्रकार घडत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकºयांनी २६ जानेवारी रोजी रात्री १.३० वाजता मालेगाव महावितरण कार्यालयावर धडक देऊन उपविभागीय अभियंत्यांना निवेदन सादर करीत, ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली. मालेगाव तालुक्यातील अमानी येथील ३३ केव्ही वीज केंद्रांतर्गत येत असलेल्या बोरगाव वीज उपकेंद्रातून पांगरी नवघरेसह परिसरातील अनेक गावांना, तसेच कृषीपंपांना वीज पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या वीज उपकेंद्रांतर्गत सातत्याने विजेचा लपंडाव सुरू आहे. या उपकेंद्रातून आधीच शेतकºयांना दिवसाकाळी प्रत्येकी चार तासप्रमाणे दोन टप्प्यांत वीज पुरवठा केला जातो. सतत होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शेतकºयांना चार तासांऐवजी केवळ दीड तास वीज मिळत आहे. त्यामुळे ऐन बहरलेली रब्बीची पिके पाण्याअभावी संकटात सापडल्याने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एखादवेळी रात्री पिकांना पाणी देत असतानाच वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर शेतकरी संबंधित लाईनमन अथवा वीज उपकेंद्रातील कर्मचाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिल्यास. तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाला असून, रात्रभर तो सुरळीत होऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येते. अशा परिस्थितीमध्ये नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकत आहे. या प्रकाराला कंटाळून गेलेल्या अमानी व बोरगाव परिसरातील शेतकºयांनी २६ जानेवारी रोजी सकाळी १.३० वाजताच्या सुमारास थेट महावितरणच्या मालेगाव कार्यालयात धडक देत प्रत्यक्ष वीज पुरवठा सुरळीत आहे की नाही याची पाहणी केली व तसेच उपविभागीय अभियंता जिवनानी यांना निवेदन देऊन शेतातील वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली.
प्रकल्पात काठोकाठ पाणी असतानाही फायदा नाहीया परिसरातील शेतकºयांच्या सिंचनासाठी उभारलेल्या कोल्ही प्रकल्पात ८० टक्क्यांच्यावर जलसाठा असताना आणि मोठ्या प्रमाणात रब्बीची पेरणी झाली असतानाही शेतकºयांना अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. परिणमी रब्बीची पिके संकटात सापडली असून, महावितरणच्या या कारभाराबाबत शेतकरीवर्गात प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार संबंधितांना सुचना देऊन, मागणी करून आणि विनंती करूनही दखल घेण्यात येत नसल्यानेच अमानी व बोरगाव परिसरातील जवळपास ४० शेतकºयांनी महावितरणच्या मालेगाव येथील कार्यालयात धडक देऊन उपविभागीय अभियंत्यांपुढे आपली समस्या मांडली.