लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम : जिल्हयातील शेतकरी कजार्तुन मुक्त होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून "मी कर्जमुक्त होणारच" अशा आशयाचे अर्ज शेतकऱ्यांकडून भरुन घेण्यात येत आहेत. हे अर्ज थेट मुख्यमंत्र्यांपर्यत पोहोचविल्या जाणार आहेत. शिवसेना तालुका शाखेच्या वतीनेही जिल्हयातील शेतकऱ्यांकडून हे अर्ज भरुन घेण्यात येत आहेत.शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहीजे असा भाव नाही. शेतकऱ्यांची यावर्षी तुर पेरली. मात्र तुरीलाही पाहीजे तसा भाव नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्ग शेतकऱ्यांची परिक्षा पाहतोय. कुठे पाऊस आहे कुठे नाही. कुठे गारपीटीने शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतकरी कर्ज घेवून शेती करतो. मात्र शेतीतही पाहीजे तसे पिकत नाही. कर्जवसुलीसाठी बँकेची पठाणी वसुली सुरु आहे. त्यांना जप्तीच्या नोटीस दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून या शेतकऱ्यांच्या मनाला उभारी देवून त्यांना संपुर्ण कर्जमुक्ती देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ह्यमी कर्जमुक्त होणारचह्ण अशा आशयाचे अर्ज वाशीम तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भरुन घेण्यात येत असून उपतालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, सर्कलप्रमुख, उपसर्कलप्रमुख यांच्याकडे हे अर्ज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी हे अर्ज भरुन द्यावे असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. यासंदभार्तील अधिक माहितीकरीता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क करुन यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. सदर अर्ज मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख राजेश पाटील, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुका प्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे,बंडू शिंदे यांनी दिली.