लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गासह राष्ट्रीय महामार्गांच्या कामासाठी गौण खनिजाची पूर्तता व्हावी आणि शेतकºयांनाही लाभ त्याचा लाभ व्हावा म्हणून शेतकºयांच्याच संमतीने शेततळे खोदण्याचे प्रस्ताव मागविण्यात आले, तसेच ईक्लास जमिनीवरही शेततळे खोदण्याचे प्रस्तावित करण्यात आले. यात ई-क्लास जमिनीवर शेततळ्यांच्या खोदकामांना सुरुवात करण्यात आली; परंतु शेतकºयांचे प्रस्ताव मात्र प्रलंबितच आहेत. जिल्ह्यात नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गासह पाच राष्ट्रीय महामार्गांची कामे करण्यात येत आहेत. या रस्त्यांच्या कामांसाठी लागणारे गौण खनिज आणि पाण्याची पूर्तता करण्यासाठी महामार्गालगत जलसंधारणाची कामे संबंधित मार्गाच्या कंत्राटदार कंपनीमार्फत करण्याचे निर्देश आहेत. या निर्देशानुसार जलसंधारणाची कामे करण्यासाठी कृषी विभाग, पाटबंधारे विभागासह इतर विभागाकडून योग्य स्थळांची निश्चिती करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या अंतर्गत शेतकºयांनी मागणी केल्यास त्यांच्या शेतातही शेततळे खोदले जाणार होते. यामुळे ई-क्लास, जमिनीसह शेतकºयांच्या प्रस्तावानुसार शेतांतील स्थळांचे सर्वेक्षणही करण्यात आले. कृषी विभागाच्यावतीने ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि योग्य स्थळांचा अहवाल जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अभियंत्यांकडे पाठविण्यात आला. त्यांच्या मंजुरीनंतर शेततळ्यांच्या खोदकामांना सुरुवातही करण्यात आली; परंतु यात प्रामुख्याने समृद्धी महामार्गालगतच्या ई-क्लास जमिनीवरच कामे करण्यात येत असून, शेतकºयांचे प्रस्ताव मात्र, धुळखात पडून आहेत.
महामार्गांसाठी जलसंधारणाच्या कामांत शेतकरी उपेक्षीत; प्रस्ताव प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 5:55 PM