लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : शेतीला अखंडित वीज मिळावी, वीज देयकांचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने शासनाने सौर कृषी पंप योजना अंमलात आणली. ज्या शेतकºयांनी वीज जोडणीकरिता पैसे भरले त्यांना सौर कृषी पंपाकरिता करण्यात येणारी सक्ती हा विषय आता शासनाने ऐच्छिक केला असल्याची माहिती कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांनी े दिलीे. शेतकºयांचा अल्पप्रतिसाद पाहता कृषी पंपाकरिता देण्यात येणारी वीज जोडणी हा विषय ऐच्छिक करण्यात यावी अशी मागणी आ.पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उजार्मंत्री यांच्याकडे केली होती. शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी आणि हरित उर्जेसाठी शासनस्तरावरून सौर कृषीपंप योजना अंमलात आली. अपारंपरिक उर्जास्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्रोत शाश्वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकºयांना सौर कृषी पंप देण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला ७५० ए.सी. आणि ५५० डी.सी. असे एकंदरित १ हजार ३०० पंप आले. तथापि, योजनेचा लाभ देताना पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणाºया शेतकºयांना ३.५ किंवा ७.५ अश्व क्षमतेचे सौर कृषी पंप दिले जाते. त्याकरिता शासनाकडून ९५ टक्के अनुदान देय आहे; तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणाºया शेतकºयांना ८५ टक्के अनुदान दिले जाते, असे असतांना देखील लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी शेतकरी उदासीन दिसत होते. तर दुसरीकडे ज्या शेतकºयांनी वीज जोडणीकरिता पैसे भरले त्यांच्याकडे सौरकृषी पंपाकरिता लागणारे अतिरिक्त पैसे नसुन त्यांचा विद्युत पोलकडे असलेला कल पहाता हा विषय शेतकºयांसाठी सक्ती ऐवजी ऐच्छिक असावा असे मत आ.पाटणी यांनी व्यक्त केले. शेतकºयांची सौर कृषी पंपाकरिता असलेली नाराजी तसेच वाढत्या तक्रारी पहाता आ.राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच उजार्मंत्री यांच्याशी चर्चा करून सौर कृषीपंपा हा विषय शेतकºयांना सक्ती ऐवजी ऐच्छिक करण्याची मागणी केली होती.
सौर कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना आता सक्ती नाही - आमदार राजेंद्र पाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 3:57 PM