वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या ४३३४ तक्रारी कृषी विभागाच्या तालुकास्तर समित्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनुसार संबंधित शेतकºयाच्या शेताला भेट देऊन पंचनामेही करण्यात आले; तथापि, दोन महिने उलटले तरी, तालुकास्तरीय समित्यांच्या पंचनाम्यांचा अहवाल शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असतानाही त्यांना अद्याप अहवाल मिळालेला नाही.यंदाच्या हंगामात बियाणे न उगवल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांना तातडीने बियाणे बदलून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी तालुकास्तरावर समित्यांची नियुक्ती केली आहे. या समितीत तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांसह कृषी विद्यापिठाच्या शास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या समित्या न उगवलेल्या बियाण्यांची पाहणी करून शेतकºयाचे नाव, गट क्रमांक, पेरलेल्या बियाण्यांची मात्रा, बियाणे न उगवण्याचे कारण आदि बाबींचा समावेश असलेला अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल संबंधित बियाणे उत्पादक कंपनीसह नुकसानग्रस्त शेतकºयांनाही द्यावा लागणार आहे. यात बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकºयांना त्यांच्या पातळीवर निर्णय घेता येणार आहे. तथापि, दोन महिने उलटले तरी, शेतकºयांना न उगवलेल्या बियाण्यांच्या पंचनाम्यांचे अहवाल अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे शेतकºयांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बियाणे सदोष असले तरच मिळणार अहवाल!जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या हजारो तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी बियाणे न उगवण्याची वेगवेगळी कारणेही आहेत. त्यामुळे बियाणे सदोष असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपनी आणि शेतकºयांना त्यांच्या पातळीवर निर्णय घेता येणार आहे. अर्थात संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई घ्यावयाची की त्यांच्या विरोधात ग्राहक पंचायतमध्ये दाद मागायची, हे शेतकºयांना ठरविता येणार आहे. तथापि, काही सदोष बियाण्यांचे अहवाल अप्राप्त आहेत.
वाशिममधील प्रक्रिया पूर्ण४वाशिम तालुक्यात बियाणे न उगवल्याच्या केवळ ४८ तक्रारी झाल्या असून, यात सदोष बियाणे प्रकरणी एका कंपनीवर कारवाई झाली, तर काही शेतकºयांना अहलवाही देण्यात आले आहेत.
न उगवलेल्या बियाण्यांच्या पंचनाम्यांचे अहवाल तालुकास्तर समित्यांकडून शेतकºयांना देण्यात येत आहेत. ज्या शेतकºयांनी पेरलेले बियाणे सदोष आढळून आले. त्यांना हा अहवाल देण्यात येत असून, ही प्रक्रिया सुरू आहे. तथापि, ज्या शेतकºयांनी पेरलेल्या बियाण्यांत दोष आढळून आला आहे. त्यांनाच हा अहवाल मिळणार असून, इतर कारणांसाठी अहवाल देता येणार नाही. .- एम. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी