* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *कारंजा लाड : शेतकऱ्यांना भरघोष उत्पन्न मिळावे, याकरिता कीटकनाशक फवारणी करून रसायनयुक्त भाजीपाला विकला जात असल्याचे विदारक चित्र बघायला मिळते. त्याचा परिणाम आरोग्यावर होऊन आजारांना आपण जवळ करतोय, अशी परिस्थिती आज दिसत आहे. यावर उपाय म्हणून सेंद्रिय उत्पादन घेणाऱ्या उत्साही शेतकऱ्यांना चालना मिळावी व रसायनमुक्त भाजीपाला ग्राहकांना मिळावा. या हेतूने * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *कारंजा तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी स्वत: पुढाकार घेऊन विकेल ते पिकेल अंतर्गत शेतकरी ते ग्राहकांपर्यंत थेट भाजीपाला विक्रीचा शुभारंभ ब्रु४ फेवारप रोजी * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *कारंजा पंचायत समिती सभागृहात तहसिलदार धिरज मांजरे यांच्या हस्ते १०० ग्राहकांना ९ प्रकारच्या भाज्याची किट देऊन करण्यात आला.
या प्रसंगी तहसीलदार धीरज मांजरे,तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, सेंदिय शेतीचे प्रचारक पवन मिश्रा, गंगा गूउद्योग चे श्याम सवाई, मंडळ अधिकारी बेलखेडे, प्रेमानंद राऊत, सोंनटके, रामेश्वर पाटील, देवानंद कटके, रविंद्र लोखंडे यांच्यासह तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी व गायवळ येथील रविंद्र लोखंडे, यांच्या सह महिला कर्मचार्याची व परिसरातील शेतकरी वर्गाची उपस्थिती होती.