वाशिम : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ओल्या दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आहेत. २ ऑक्टाेबर राेजी शिवणी येथे विराेधीपक्ष नेता गेले असता शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीवाले ५०० रुपये मागत असल्याची व्यथा मांडली.
वाशिम जिल्ह्यातील शिवणी येथे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी संगीतल्यानुसार अजून पंचनामे झाले नाहीत आणि शेतकऱ्यांना पंचनामे करण्यासाठी पैसे मागितले जात आहेत.त्यामुळे मी जिल्हा प्रशासनासोबत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे यासाठी सरकारला कळविणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राजेंद्र पाटणी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजु पाटील राजे यां