शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

आधार प्रमाणिकरणात अडकली शेतकरी कर्जमुक्ती योजना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:49 AM

लॉकडाउनच्या कालावधीत उर्वरित २८ हजार २५८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेककरीता जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले असून आतापर्यंत ७० हजार ९६५ शेतकऱ्यांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. लॉकडाउनच्या कालावधीत उर्वरित २८ हजार २५८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले. त्यामुळे या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ तुर्तास मिळाला नसून, नवीन पीककर्जही मिळत नसल्याने शेतकºयांसमोरील अडचणीत भर पडली.महाविकास आघाडी सरकारने दोन लाख रुपये मर्यादेपर्यंत राज्यातील शेतकºयांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले आहेत. शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, त्याची शेतकºयांना माहिती देऊन मान्यता घेण्यासाठी आधार प्रमाणिकरण करण्याची कार्यवाही सुरू होती. विशिष्ट क्रमांकासह प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव असलेल्या शेतकºयांना आपल्या नावासमोरील विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक व बँक पासबुकसह आपले सरकार सेवा केंद्र अथवा संबंधित बँकेत जावून आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणिकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, थकीत कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तरच ‘मान्य’ पर्याय निवडून शेतकºयांना आपले आधार प्रमाणिकरण पूर्ण करावे लागते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर २४ मार्चपासून आधार प्रमाणिकरण प्रक्रिया बंद करण्यात आली. तत्पूर्वी ७० हजार ९६५ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाल्याने या शेतकºयांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. उर्वरित २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण होउ शकले नाही. कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे सध्या ही प्रक्रिया ठप्प असल्याने आणि कर्जमुक्तीचा लाभ न मिळाल्याने २८ हजार २५८ शेतकºयांना नवीन कर्जाची प्रतिक्षा कायम आहे. आधार प्रमाणिकरण अपूर्ण राहिलेल्या शेतकºयांनादेखील राज्य शासनाच्या निर्णयानुसार बँकांनी यंदा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक आहे. तशा सूचनाही कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेल्या आहेत. तथापि, अद्याप या शेतकºयांना पीककर्ज वाटप सुरू झाले नाही. यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

कर्जरक्कम जूळत नसल्यास ‘अमान्य’ पर्याय उपलब्धसंगणकाच्या स्क्रीनवर दिसणाº्या माहितीमधील आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, कर्जाची रक्कम जुळत नसल्यास किंवा रक्कम चुकीची असल्यास शेतकºयांनी ‘अमान्य’ पर्यायाची निवड करून आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. ‘अमान्य’ केलेली प्रकरणात संबंधित शेतकºयांची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठविली जाते. त्यावर जिल्हास्तरीय समिती योग्य निर्णय घेते. परंतू, लॉकडाउनमुळे ही प्रक्रियाच ठप्प असल्याने या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ कधी मिळणार हे अद्याप तरी अनिश्चित आहे.यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँकेचे वाशिम व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर म्हणाले की, कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाउन असल्याने आणि खबरदारी म्हणून आधार प्रमाणिकरण बंद आहे. जिल्ह्यातील ७० हजार ९६५ शेतकºयांना ४५३ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहे. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर या शेतकºयांनादेखील कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. आधार प्रमाणिकरण राहिलेल्या शेतकºयांनादेखील पीककर्जाचा लाभ द्यावा, अशा सूचना जिल्ह्यातील बँकांना दिलेल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी