वाशिम, दि. ५- नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गासंदर्भात मालेगाव तालुक्यातील बागायती शेतीचे संपादन करू नये या मागणीसाठी शेतकरी शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गासाठी मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरातील सुपिक अशा संत्रा बागायती जमिनीचे संपादन होणार आहे. समृद्धी महामार्गासंदर्भात सविस्तर माहिती अद्यापही मालेगाव तालुक्यातील शेतकर्यांना मिळालेली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न वाशिम जिल्हा संघर्ष कृती समिती व शेतकरी शिष्टमंडळाने केला. मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला वेळ देऊन निवेदन स्वीकारले. बागायती जमिनीचे संपादन करण्यात येऊ नये तसेच समृद्धी महामार्गात संपादित होणार्या जमिनीचा मोबदला व अन्य बाबींची इत्यंभूत माहिती अगोदर शेतकर्यांना देण्यात यावी, अशी अपेक्षाही यावेळी शेतकर्यांनी व्यक्त केली. मुंगळा हे गाव ऑरेंज व्हिलेज म्हणून ओळखले जाते. समृद्धी महामार्गासाठी या ह्यऑरेंज व्हिलेजह्णबाबत विचार व्हावा, असे मत शेतकर्यांनी मांडले. महामार्गासंदर्भात शेतकर्यांनी उपविभागीय अधिकार्यांकडे हरकती नोंदविल्या आहेत, ही बाबही शेतकर्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिली. हरकतीवर समाधानकारक उत्तरे येण्यापूर्वीच मुंगळा व मालेगाव तालुक्यात सर्वेक्षणासाठी अधिकारी येत असल्याने शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली. बागायतदार शेतकर्यांच्या व्यथा जाणून घ्याव्या, अशी मागणी वाशिम जिल्हा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष आनंद नाईक, सुरेश राऊत, प्रभुदास कल्याणकर यांच्यासह इतर शेतकर्यांनी केली.
समृद्धी महामार्गाबद्दल शेतक-यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले!
By admin | Published: January 06, 2017 2:21 AM