--------------
कामरगाव परिसरात अनियमित वीजपुरवठा
वाशिम : कामरगाव परिसरातील इतर काही गावांमध्ये आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे भाजीपाला पिकांचे सिंचन प्रभावित होत असल्याने शेतकरी; तर तापत्या उन्हात घरातील पंखे बंद राहत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
-----------------
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : मानोरा तालुक्यातील साखरडोह येथे कृषी विभागामार्फत बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासण्यासंदर्भात २९ जूनरोजी ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कृषीसहाय्यकांनी मार्गदर्शन केले.
------------------
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
वाशिम : सर्दी, खोकला आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून मानोरा तालुका आरोग्य विभागाने परिसरात मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने सोमवारी रुग्णांची आरोग्य तपासणी केली.
------------------
काजळेश्वर परिसरात पाऊस
वाशिम : कारंजा तालुक्यातील मनभा परिसरात गुरुवारी सायंकाळी तुरळक पाऊस झाला. यामुळे शेतकरी सुखावला असून, या पावसामुळे शेतकऱ्यांनी रखडलेल्या खरीप पेरणीला सुरुवात झाली आहे.
------------------
पीककर्ज वाटप संंथ
वाशिम : खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असतानाही धनज बु. परिसरातील बँकांत पीककर्ज वाटपाचा वेग संथ आहे. त्यामुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत असून, तातडीने पीककर्ज वाटप करणे आवश्यक ठरत आहे.
------------------