लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: आॅक्टोंबर, डिसेंबर २०१६ या आर्थिक वर्षामध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागल्याने अशा सोयाबीन उत्पादक शेतकºयांना २०० रु. प्रती क्विंटल दराने अनुदान देण्यात शासन निर्णय घेवुन जवळपास १० महिन्याचा कालावधी उलटुनही प्रत्यक्षात शेतकºयांच्या ही रक्कम पदरात पडलीच नाही. यावर्षी वाशिम जिल्ह्यात सर्वत्र सदोष दुष्काळदृष्य परिस्थिती असुन आता शेतकरी वर्गाजवळ कवडीही नाही. अशा अंधकारमय परिस्थितीत सोयाबीन सोंगणी व काढणीसाठी कोणत्याच शेतकºयांकडे पैसा नाही तेव्हा सदरची दोनची रुपये प्रती क्विंटल ची अनुदान रक्कम त्वरित त्यांना देणे आवश्यक असताना याकडे संबधितांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मागील वर्षी सोयाबीन पिकाच्या उत्पादनात वाढ झाल्याने अपेक्षीत बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकºयाची निराशा झाली होती. ही नाराजी दुर करुन आर्थिक आधार देण्याचे संकल्प राज्याच्या सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाने १० जानेवारी २०१७ रोजी शासन निर्णय पारित करुन माहे आॅक्टोंबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत सोयाबीन विक्री केलल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अशा शेतकºयांना २०० रुपये प्रती क्विंटल दराने अनुदान देण्याच्या ठरविले. जिल्ह्यातील २३ हजार ९६१ शेतकºयांनी सदर अनुदानासाठी प्रस्ताव सादर केलेत. प्रस्तावानुसार २३ कोटी ८३ लाख एवढा अनुदान असुन १० महिन्याचा कालावधी उलटुनही सदर अनुदान लालफितशाहीच्या कारभारात अडकुन पडले असुन आता यावर्षी वाशिम जिल्हयात पावसाने दांडी मारल्याने सर्वदुर दुष्काळग्रस्त परिस्थती आहे. तेव्हा सोयाबीन काढणी व सोंगणी करण्याला पैसाच नाही आधीच कर्जमाफीचा गजर दाखवुन शेतकºयांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे प्रकार थांबवुन तात्काळ अनुदान देणे आवश्यक आहे.
सोयाबीन अनुदानापासून शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 7:47 PM
मानोरा: आॅक्टोंबर, डिसेंबर २०१६ या आर्थिक वर्षामध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागल्याने अशा सोयाबीन उत्पादक शेतकºयांना २०० रु. प्रती क्विंटल दराने अनुदान देण्यात शासन निर्णय घेवुन जवळपास १० महिन्याचा कालावधी उलटुनही प्रत्यक्षात शेतकºयांच्या ही रक्कम पदरात पडलीच नाही.
ठळक मुद्देदहा महिन्यापासून प्रतिक्षा २४ हजार शेतकºयांचे प्रस्ताव