मंगरुळपीर, दि. 3 - शासनाच्या कर्जमाफी योजनेसह पिक विम्याचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन सेवा केंद्रावर शेतकºयांची झुंबड उडत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.शासनाने नैसर्गिक आपत्तीचा सतत सामना करीत असलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासरसकट दिड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या नावाने राबविण्यात येत असलेल्या या कर्जामाफी योजनेत शेतकºयांना आधार क्रमांकासह ऑनलाईन पध्दतीने सेवा केंद्रावर अर्ज सादर करावे लागत आहे. वेळेत अर्ज दाखल करता यावे म्हणून शेतकरी सर्व आवश्यक कागदपत्रे घेवुन ऑनलाईन सेवा केंद्राकडे धाव घेत आहे. त्यामुळे विविध सेवा केंद्रावर शेतक-यांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान प्रधानमंत्री पिकविमा योजनेला शासनाने ५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ दिल्यामुळे या योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी सेवाकेंद्रावर दिसून येत आहे.
कर्जमाफी व पिकविम्याच्या अर्जासाठी सेवा केंद्रावर शेतक-याची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2017 2:28 PM