शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

गुरांच्या चाऱ्यासाठी चारापिकांवर शेतकऱ्यांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:43 AM

जिल्ह्यात तृणधान्याच्या पेरणीचे क्षेत्र घटले आहे, तर कुरण क्षेत्रातही मोठी घट झाली. त्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. ...

जिल्ह्यात तृणधान्याच्या पेरणीचे क्षेत्र घटले आहे, तर कुरण क्षेत्रातही मोठी घट झाली. त्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. यावर पर्याय म्हणून शेतकरी आता शेतजमिनीतच चारा लागवडीसाठी राखीव क्षेत्र सोडून विविध प्रकारच्या चारापिकांची लागवड करीत आहेत. त्यात नेपिअर या गवताच्या लागवडीचे प्रमाण वाढत आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असून, जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे, शिवाय लागवड तंत्रज्ञान, कापणी, गवताचे आहारातील प्रमाण व पद्धत याविषयी सखोल माहिती पशुपालक शेतकऱ्यांना देऊन दूध व्यवसायात वाढ होण्याच्या दृष्टीने नेपिअर गवत कसे फायदेशीर आहे, ते पटवून देण्यात येत आहे.

-----------

शेतकऱ्यांना गवताच्या थोंबाचे वाटप

गुरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांनी नेपिअर गवत किंवा इतर चारा पिकांची लागवड करावी, म्हणून त्यांना मार्गदर्शन करतानाच कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना गवताच्या थोंबाचे मोफत वितरण केले जात आहे. काही दिवसांपूर्वी वाशिम तालुक्यातील कळंबा महाली व पार्डी टकमोर या गावातील पशुपालक शेतकऱ्यांना गवताचे थोंब वाटप करण्यात आले.