या संदर्भात पंडित ग्यानबा दंडे या शेतकऱ्याने जलसंपदा मंत्र्यासह मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली आहे परंतु त्याचाही फायदा झाला नाही. शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी १९७७-७८ मध्ये वाशिम पाटबंधारे विभागाने वार्ला एम आय टँक सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली . या धरनामध्ये / टँकमध्ये पिंपळगाव डाग बंगला येथील तरूण शेतकरी ग्यानबा दंडे यांची ब्रम्हा शिवारातील सर्व्हे नं ७८ गट नं १८९ मधील चार एकर शेत बुडीत क्षेत्राखाली बाधित झाली. सदर शेतकरी ९० वर्षाचे झाले असून ४३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही मोबदला न मिळाल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मुलगा की ज्याच्या वाट्यावर ही जमीन आहे त्या पंडित गयानबा दंडे ह्या ४५ वर्ष मुलाने मोबदल्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे . अधिकारी मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. ४३ वर्षाच्या पीक नुकसान भरपाईसह जमिनीचा मोबदला त्वरित देण्यात यावा आशी मागणी पंडित गयानबा दंडे यांनी कार्यकारी अभियंता वाशिम पाटबंधारे विभाग वाशिम, अधीक्षक अभियंता पाट बंधारे मंडळ वाशिम ,जिल्हाधिकारी वाशिम, विभागीय आयुक्त अमरावती विभाग अमरावती, कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर, अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग मंत्रालय , मंत्री जलसंपदा विभाग मंत्रालय , मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
४३ वर्षांपासून शेतकरी बाधित जमीन माेबदल्याच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:43 AM