- शंकर वाघलोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : आगामी खरीप हंगामसाठी सद्या बँकांकडून कर्ज वाटपाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, कर्ज मिळविताना शेतकऱ्यांना विविध स्वरूपातील त्रास सहन करावा लागत असून यंदा पीक कर्ज हवे असल्यास पाच कोरे धनादेश बँकेकडे सुपूर्द करावे लागत आहेत. वृद्ध शेतकऱ्यांनी कर्जाची मागणी केल्यास त्यांच्या वारसाला सहकर्जदार बनविले जात आहे. या प्रकारामुळे शेतकरी पुरते वैतागले असून त्यांच्याच तीव्र संताप व्यक्त होत आहे.शिरपूर जैन येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत परिसरातील शेतकरी खरीप हंगामासाठी पीक कर्जाची उचल करतात. दरवर्षी या बँकेकडून नियमित कर्ज घेणाºया आणि ते विहित मुदतीत अदा करणाºया शेतकऱ्यांकडून यंदा पुन्हा कर्जाची मागणी केली जात आहे. मात्र, बदललेल्या नव्या नियमानुसार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता पाच कोरे धनादेश सादर करावे लागत आहेत. हा प्रकार सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत असून हातातील सर्व कामे सोडून सर्वात आधी संबंधितांना धनादेशाचे पुस्तक काढून घ्यावे लागत आहे. त्यात बराच वेळ खर्ची होत आहे. याशिवाय ६० वर्षावरील शेतकºयांना त्यांच्या वारसास सहकर्जदार म्हणून सादर करावे लागत आहे. एकूणच या सर्व नव्या बाबींमुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले असून पीक कर्ज मिळण्यासही विलंब लागत आहे.वरिष्ठांच्या आदेशानुसार पीक कर्जाची मागणी करणाºया शेतकऱ्यांकडून ‘सेक्यूरिटी’ म्हणून पाच धनादेश मागविण्यात येत आहेत. तसेच वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या वारसास सहकर्जदार केले जात आहे.- ए. एस. गोसावीशाखाधिकारी, विदर्भ कोकण बँक, शाखा शिरपूर
पीककर्जासाठी शेतकऱ्यांना द्यावे लागताहेत कोरे धनादेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 3:32 PM