लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी वाशिम जिल्ह्यातील महा-इ सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रावर येत असल्याचे दिसून येते.राज्य शासनाने १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत कर्ज घेतलेले व ३० जून २०१६ रोजी थकीत असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफी जाहिर केलेली आहे. कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव परिसरातील शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वाशिम गाठले आहे. तिकडे कनेक्टिव्हिटी राहत नसल्याने तसेच जादा भारनियमन असल्याने आॅनलाईन अर्ज सादर करण्यात व्यत्यय येत असल्याचे या शेतकºयांनी सांगितले. अंतिम मुदतीपर्यंत अर्ज सादर करता यावे, यासाठी १४ व १५ सप्टेंबर रोजी गोरेगाव येथील शेतकरी वाशिम येथील महा ई सेवा केंद्रात अर्ज भरण्यासाठी आले होते. २२ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असून, वाशिम जिल्हा सिमेलगत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी वाशिम शहर गाठत आहेत.
कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी वाशिमात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 7:49 PM
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी वाशिम जिल्ह्यातील महा-इ सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रावर येत असल्याचे दिसून येते.
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाहिंगोली जिल्ह्यातील शेतकरी पोहोचले वाशिम शहरात