लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सोयाबिन, तूर, उडिद, कपाशी आदी पिकांची प्रचंड हानी झाली. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे ताबडतोब सर्व्हेक्षण करुन त्यांना आर्थीक मदत मिळवून देण्यासाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्याला भेट देवून तहसीलदार यांना निवेदन देण्यात येत आहे. त्वरित मदत न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा संघटनेच्यावतिने देण्यात आला आहे.दिवाळी दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांची दिवाळी तर अंधारात गेलीच शिवाय येणाºया पिकावरील नुकसानामुळे नियोजनही कोलमडले. अशा परिस्थितीत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अने क भागातील नुकसानीचे सर्व्हेक्षण अदयाप झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. तरी संबधित आधिकारी यांनी ताबडतोब नुकसान भागाचे पंचनामे करावेत अशा मागणीचे निवेदन वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर तहसीलदार यांना देण्यात आले असून उदयापर्यंत कारंजा व मानोरा येथील तहसीलदारांनाही निवेदन देण्यात येणार आहे. संघटनेच्यावतिने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, विमा कंपनीचे कार्यालय तालुकास्तरावर नाहीत. त्यांचे प्रतिनिधी कोण? हे शेतकºयांना माहिती नाही. याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करुन त्यांची गैरसाये दूर करणे आवश्यक असतांना तसे होतांना दिसनू येत नाही. तसेच शेतकºयांच्या सर्व्हेक्षण व मदतीमध्ये दिरंगाई झाल्यास जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी बचास संघर्ष संघटनेच्यावतिने देण्यात आला आहे.
येत्या दोन दिवसांत गावपातळीवरील कर्मचारी व विमा कंपनीचे प्रतिनीधी यांच्याकडुन प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात न झाल्यास व शासनाने बांधीत शेतकºयांना मदत जाहिर न केल्यास संघटनेच्यावतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. उद्भवणाº्या परिस्थितीस शासन व प्रशासन जबाबदार राहील.- राजू वानखडेसंस्थापक अध्यक्ष, शेतकरी बचाव संघर्ष संघटना