सिंचन सुविधांचा प्रभाव : दरवर्षी क्षेत्रात वाढलोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी हळद लागवडीला प्राधान्य दिले असून,गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हळद लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दहा वषार्पूर्वी हळदीची लागवड वाशीम जिल्ह्यात केवळ गावातील एखादा शेतकरीच करीत होता. मधल्या काळात विहिरी, सिंचन तलाव, शेततळे, जलयुक्त शिवार अशी सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवडीला पसंती देत आहेत. दहा वषार्पासून दरवर्षी क्षेत्रात वाढ होत आहे. मागील वर्षी शिरपूर येथे ९०० ते १००० एकरात विविध शेतकºयांनी हळदीची लागवड केली होती. यंदा मात्र तब्बल पंधराशे एकरापेक्षा जास्त क्षेत्रात शेतकº्यांनी हळदीची लागवड केलेली आहे. मागील वर्षी हळदीला ४२०० रुपयापासून बाजार भाव मिळाला. तरीसुद्धा यावर्षी हळदीचे लागवड क्षेत्र वाढले. हळदीचे एकरी उत्पादन १० ते २५ क्विंटलपर्यंत होते. त्यामुळे शेतकºयांचा कल हळद लागवडीकडे दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकº्यांना अपेक्षा असते ती कमीत कमी आठ हजार रुपये क्विंटल हळदीला भाव मिळण्याची. पुढील वर्षी हळद लागवडीचे क्षेत्र यापेक्षा अधिकही वाढू शकते असे शेतकºयांमध्ये बोलल्या जात आहे.
शिरपूरात शेतकऱ्यांनी दिली हळद पिकाला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 3:04 PM
शिरपूर जैन : सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी हळद लागवडीला प्राधान्य दिले असून,गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हळद लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.
ठळक मुद्देदहा वषार्पूर्वी हळदीची लागवड वाशीम जिल्ह्यात केवळ गावातील एखादा शेतकरीच करीत होता. हळदीचे एकरी उत्पादन १० ते २५ क्विंटलपर्यंत होते. त्यामुळे शेतकºयांचा कल हळद लागवडीकडे दिवसेंदिवस वाढत आहे.