वाशिम - मालेगाव तालुक्यातील चांडस येथे शेतात जाण्याकरीता शेतकऱ्यांनी लोकवर्गणी व श्रमदानातून तयार केलेला रस्ता इतरांनी अडविल्याने शेतात जाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. हा रस्ता तातडीने मोकळा करण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीसह शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत प्रशासनाकडे निवेदन सादर केले.ग्राम चांडस येथे सन २०१३ पासून शेतकरी रामेश्वर मोरे व इतर शेतकऱ्यांच्या शेतातील वहितीकरीता असलेला रस्ता संबंधितांनी काट्या लावून अरुंद केला. या रस्त्यावर पावसाचे पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांनी लोकवर्गणी व श्रमदान करुन रस्त्यावर भराव केला. या रस्त्याचे जवळपास ९५ टक्के काम पुर्ण झाले आहे. हा रस्ता इतर काही जणांनी अडविल्यामुळे मोरे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांना शेतात जावे कसे? असा प्रश्न पडला आहे. शेतात जाताना इतरांकडून असाच अडथळा सुरु राहीला तर लोकवर्गणी व श्रमदान वाया जाईल व पुन्हा लोकवर्गणीकरीता कुणीही तयार होणार नाही, अशी भीती मोरे यांच्यासह शेतकºयांनी निवेदनातून वर्तविली. याप्रकरणी वंचित बहूजन आघाडीच्या महिला प्रदेश सदस्या किरणताई गिºहे यांच्या नेतृत्वात व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकºयांच्या उपस्थितीत सुरूवातीला मालेगाव तहसिल कार्यालय आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत रस्ता मोकळा करण्याची मागणी केली. रस्ता मोकळा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
रस्ता अडविल्याप्रकरणी शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 12:59 PM
Farmers, Washim District शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
ठळक मुद्दे रस्ता अडविणाºयांवर कारवाईची मागणी