लोकमत न्यूज नेटवर्कमोप : येथील शेतकऱ्यांनी सकाळी रिसोड ते लोणार रोडवर शेतकरी संपात सहभाग नोंदविण्यासाठी रास्तारोको केला.यावेळी दोन किलोमिटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या तसेच रस्त्यावर दुध सांडवून भाजप सरकारचा निषेध नोंदवला.शेतकऱ्यांनी रास्तारोको केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या तसेच शेतकरी एकत्र आल्याने त्यांनी यापुढे कोणताही शेतमाल संपा दरम्यान शहराकडे जावु न देणाचा निर्णय घेतला. गावातल्या गावातच या वस्तु विनिमय करण्याचे ठरविले. परिसरातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी दुध संकलन केंद्र बंद ठेवुन या संपात सहभाग नोदंविला तसेच दुध रस्त्यावर सांंडवून दिले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले व शासनाने जर मागण्याचा विचार केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या संपात सहभागी शेतकऱ्यांशी फोनव्दारे आमदार अमित झनक यांनी संपर्क साधुन संपकरी शेतकऱ्यांना पाठींबा दर्शविला.