लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी : मानोरा तालुक्यातील दापुरा येथील शेतकºयांसह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध मागण्यांसाठी १३ फेबुवारी रोजी सकाळी ११.३० वाजपापासून दापुरा नाल्यावर रास्ता रोको करण्यात आला.दापुरा येथील विविध मागण्या शासन दरबारी पडून आहे अनेक निवेदन देवुन सुध्दा शासन मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अतिवृष्टी मुळे भयंकर नुकसान झालेल्या पिक जमीनीची नुकसान भरपाई मिळावी, पिकविम्याचा सर्वे होवुन लाभ मिळाला नाही, त्यामुळे पिक विमा त्वरित द्यावा, गाळलेल्या खचलेल्या विहीरीची दुरुस्ती करुन मिळावी शेतजमीनीची झालेल्या नुकसानाची दुरुस्ती रोहयो योजनेतुन मिळावी, इंझोरी तु दापुरा जुना रस्ता वाहतुक योग्य करुन मिळावा या मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला आहे. या आंदोलनात शेतकºयांसह माजी जि.प. मंडळ सदस्य अनिल राठोउ, अरविंद पाटील, गजानन अहमदाबादकर, ओमप्रकाश तापडीया, विठ्ठलराव घाडगे, जि.प.सदस्या अनिता राऊत, पं.स.सदस्य गजानन भवाने, सुधीर राऊत, नंदाताई तायडे आदिंची उपस्थिती होती.
दापुरा नाल्यावर शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 2:45 PM