लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम तोंडावर आल्याने पीककर्ज काढण्यासाठी शेतकºयांची विविध बँकांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. शेतकºयांप्रमाणेच विविध योजनेंतर्गतचे लाभार्थीही अनुदान काढण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करीत असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे रिसोड, मानोरा व किन्हीराजा येथे ३ जून रोजी दिसून आले.रिसोड : खरीप पीककर्ज काढण्यासाठी तसेच विविध योजनेंतर्गत बँकेत जमा झालेले अनुदान काढण्यासाठी नागरिकांची ३ जून रोजी राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकेत गर्दी झाल्याचे दिसून आले. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी बँकांसमोर गर्दी करू नये असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे वारंवार करण्यात आले. गर्दी टाळण्यासाठी बँकेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ अशी करण्यात आली. तथापि, बँकांमधील गर्दी कमी होत नसल्याचे ३ जून रोजीही दिसून आले. बँकेत गर्दी होऊ नये म्हणून बँकांसमोर आता पांढºया रंगात वर्तुळी रंगविण्यात आले नाही. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन झाले नसल्याचेही दिसून आले.किन्हीराजा : किन्हीराजा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असून, येथे विविध कामांसाठी नागरिकांची बँकेत गर्दी होत असल्याचे ३ जून रोजी दिसून आले. खते, बियाण्यांची जूळवाजूळव करण्यासाठी नागरिकांना पैशाची गरज असून, पीककर्ज काढण्यासाठी शेतकºयांची एकच धावपळ होत असल्याचे किन्हीराजा परिसरात दिसून येते. बँकांसमोर नागरिकांची गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.मानोरा : मानोरा तालुक्यात एक जण कोरोनाबाधित असल्याचे ३ जून रोजी स्पष्ट झाले. तथापि, बँकांमधील व बँकांसमोरील गर्दी कमी होत नसून नागरिक बिनधास्त असल्याचे ३ जून रोजी दिसून आले. कोरोनाचा धोका अजून संपलेला नसून, नागरिकांनी विशेष काळजी व दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा तसेच तालुका प्रशासनातर्फे वारंवार करण्यात आले. परंतू, याकडे दुर्लक्ष करीत नागरिक बँकांमध्ये गर्दी करीत असल्याचे तसेच बँक प्रशासनाही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करीत नसल्याचे बुधवारी दिसून आले.
कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ; बँकांमध्ये गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 4:11 PM