वाशिम : मालेगाव बाजार समितीमध्ये आधिच उशिरा सुरु केलेल्या नाफेड खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांचा माल पडून राहिला. खरेदी केंद्र सुरु केल्यानंतर हेक्टरी ४ क्विंटलच खरेदी करण्याचा नियम शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
साधारणता शेतकऱ्यांना हेक्टरी दहा ते बारा क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे. तुरीला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्याने अडचणीत आलेल्या शेतकºयांसाठी नाफेडमार्फत तूर खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार मालेगाव बाजार समितीमध्ये नाफेडचे तूर खरेदी केंद्र मागील काही दिवसांपासून सुरु झाले. परंतु ही खरेदी करतांना हेक्टरी केवळ चार क्विंटल खरेदी करण्याच्या निकषामुळे इतर माल शेतकऱ्यांनी कुठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रावर जावून चौकशीनंतर मालच बाजार समितीमध्ये आणतांना दिसून येत नाहीत. तालुका खरेदी विक्री संघामार्फत नोंदणीकृत शेतकºयांना बाजार समितीत माल आणण्यासाठी मोबाईलवर संदेश देण्यात येत आहेत. परंतु मालासाठी लावलेल्या निकषामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. या संदर्भात शेतकºयांनी जिल्हा मार्केट अधिकारी तराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेक्टरी खरेदीत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
शासनाने शेतकºयांचा रोष लक्षात घेवून हेक्टरी किमान १० क्विंटल तूर नाफेडमार्फत खरेदी करावी. शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक असतांना ती अर्धाी बाजार समितीला विकणार व बाकीच्या विकण्यासाठी कुठे जाणार यासाठी प्रशासनाने विचार करुन हा निकष बदलणे गरजेचे आहे. आपण यासाठी सतत प्रयत्न करीत असून शेतकºयांचा जास्तीत जास्त माल कसा घेता येईल यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
- भगावान शिंदे, अध्यक्ष, तालुका खरेदी विक्री संस्था
शासनाने लादलेली मर्यादा अतिशय अन्यायकारक असून शेतकºयांनी पिकविलेले अर्धे धान्य (तूर) शासकीय खरेदी केंद्रावर दयावे तर उर्वरित धान्याची विक्री कुठे करावी. शासनाने शासकीय खरेदी केंद्रावर कमीत कमी एकरी सहा क्विंटल तूर खरेदी करावी. या संदर्भात आपण वरिष्ठांना पण सूचना, मॅसेज केले आहेत. परंतु अद्याप यावर कोणताच निर्णय न झाल्याने आमच्यासारखे शेतकरी अडचणीत आले आहेत.
- गजानन लहाने, शेतकरी, तिवळी