मानोरा (वाशिम): पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहिर योजनेत अन्याय झाल्याचे कारण समोर करून तालुक्यातील कारपा येथील शेतकरीपुत्र राजूसिंग तुळशीराम जाधव यांनी तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला हाती रॉकेलची कॅन घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पोलिसांनी बाळगलेल्या सतर्कतेमुळे कुठलाही अनर्थ घडला नाही. पोलिसांनी जाधव यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेत तुळशिराम जाधव या शेतकºयांनी आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केली, तरीही त्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला. दुसरीकडे अधिकारी व संबंधित यंत्रणेने बोगस लाभार्थ्यांना विहीरीचा लाभ मिळवून दिला. त्याची सखोल चौकशी व्हायला हवी. या मागणीची दखल न घेतल्यास २६ जानेवारी रोजी तहसील कार्यालय परिसरात आत्मदहन करणार असल्याचा इशारा राजूसिंग जाधव यांनी दिला होता. त्यानुसार, प्रजासत्ताकदिनी त्यांनी आपल्यासोबत रॉकेलची कॅन घेवून तहसील कार्यालयाच्या मागच्या बाजूने तहसीलमध्ये प्रवेश केला. ‘जय जवान जय किसान’चा नारा देत स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक व्ही.व्ही. वानखेडे यांच्या फिर्यादीवरून राजूसिंग जाधव यांच्याविरूद्ध कलम १०७, ११६ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.कारपा येथील पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहिर योजनेचा लाभ चुकीच्या लाभार्थींना दिला असेल तर त्याची सखोल चौकशी होईल. दोषी आढळणाºयांची हयगय केली जाणार नाही. - सुरज गोहाड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मानोरा
मानोरा तहसील कार्यालयासमोर शेतकरीपुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 7:59 PM
मानोरा (वाशिम): पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहिर योजनेत अन्याय झाल्याचे कारण समोर करून तालुक्यातील कारपा येथील शेतकरीपुत्र राजूसिंग तुळशीराम जाधव यांनी तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला हाती रॉकेलची कॅन घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
ठळक मुद्देपालकमंत्री सहस्त्र सिंचन विहीर योजनेत तुळशिराम जाधव यांनी आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता केली, तरीही त्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला.मागणीची दखल न घेतल्यास २६ जानेवारी रोजी तहसील कार्यालय परिसरात आत्मदहन करणार असल्याचा इशारा राजूसिंग जाधव यांनी दिला होता. यावेळी प्रसंगावधान राखून पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले.