पाईपलाईन नादुरुस्त
वाशिम: जीवन प्राधिकरणच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची पाईपलाईन लिकेज होऊन पाणी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. गुरुवारीही ही समस्या जाणवली. ही पाईपलाईन दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.
पशू लसीकरणाची पशुपालकांना प्रतीक्षा
वाशिम: मानोरा पशू वैद्यकीय दवाखान्याकडून काही महिन्यांपूर्वी गुरांना लसीकरण करण्यात आले. तथापि, इंझोरी, दापुरा आणि इतर गावात अद्यापही ही मोहीम राबविण्यास सुरुवात झाली नाही. त्यामुळे पशुपालकांत नाराजी आहे.
अनसिंगचे पोलीस पाटील पद रिक्तच
वाशिम: येथील पोलीस पाटलाचे पद गत दोन वर्षांपासून रिक्त आहे. ते भरण्यासंबंधी संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले असून अनसिंग येथील ग्रामस्थांना विविध महत्त्वाची कागदपत्रे व दाखले मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
वाशिम-पुसद रस्त्याची अवस्था वाईट
दगड उमरा : वाशिम ते पुसद महामार्गावरील जाभंरूण जहॉगीर फाट्यानजीक मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करीत मार्ग काढावा लागत आहे.