लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी शेतकºयांना कमालीची दमछाक करावी लागली.बँकामध्ये वेळेवर कागदपत्र न घेतल्याने सेतु केंद्रावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.प्रधानमंत्री विमा योजना अंतर्गत विमा उतरविण्यासाठी ४ आॅगस्ट रोजी सेतु केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नेट कनेक्टीव्हीटी नसल्यामुळे आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी खोडा निर्माण होत होता. दिवस गट त्रस्त झालेल्या शेतकºयाने तहसीलदार यांची भेट घेतली.पिक योजना अंतर्गत येत असलेल्या अडचणीचा पाडा वाचला. मान्यता प्राप्त तहसील कार्यालयावर असलेल्या सेतु केंद्रावर कामाचा ताण वाढत असल्यामुळे शेतकºयांची इतरत्र धाव घेतली. गेल्या दोन दिवसात किती शेतकºयाचे अर्ज भरण्यात आले. या संदर्भात विचारणा केली असता सेतु केंद्र प्रतिसाद मिळाला नाही. पंतप्रधान विमा योजनाची अंतीम तारीख ३१ जुलैपर्यंत होती, परंतु शासनाच्या परिपत्रकानुसार योजनेतील बिगर कर्जदार शेतकºयांसाठी सहभागाची मुदत ४ आॅगस्टपर्यंत देण्यात आली.मुदत १५ आॅगस्टपर्यंत वाढविण्याची मागणीपंतप्रधान विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतीम मुदत १५ आॅगस्टपर्यंत करण्याची मागणी शेतकºयाकडून होत आहे. आॅनलाईन फार्म भरण्यासाठी येत असलेले अडथळे त्यामुळे अनेक शेतकरी विमा योजनेंपासून वंचित राहत आहे.
पिक विम्यासाठी शेतक-यांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 7:22 PM
मानोरा : प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी शेतकºयांना कमालीची दमछाक करावी लागली.बँकामध्ये वेळेवर कागदपत्र न घेतल्याने सेतु केंद्रावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
ठळक मुद्देप्रधानमंत्री पिक विमा योजना नेट कनेक्टीव्हीटी नसल्यामुळे खोडा सेतु केंद्रावर कामाचा ताण वाढला