तालुक्यातील शेलुबाजार येथे भरणारा बैलबाजार बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बैलासाठी गावोगावचे शिवार पालथे घालत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. गावखेड्यातील शेतकरी आजही पारंपरिक पध्दतीने शेती करतात. बोटावर मोजके मोठे शेतकरी शेतात मशागतीची कामे ट्रॅक्टरद्वारे उरकून घेतात. अल्पभूधारक शेतकरी आजही शेतातील सर्व काम बैलांच्याच बळावर करतात. अशक्त झालेली बैलजोडी बाजारात विकून शेतकरी नवीन बैलजोडी खरेदी करतात व आपले शेतशिवार फुलवितात. आज डिझेलचे भावही वाढल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर न परवडणारा झाला आहे . अशावेळी बैल जोडीच त्याच्या कामात येते.परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे आठवडी बाजारासह बैलबाजारसुद्धा बंद असल्याने शेतकऱ्यांना बैल खरेदी,विक्री करता येत नाही. त्यामुळे जादा पैसे देऊन ट्रॅक्टरच्या साह्याने शेतकरी मशागतीची कामे करीत आहेत.
गुरांचे बाजार बंद असल्याने शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:31 AM