वाशिम: कमी दराने तूर खरेदी करून तीच तूर "नाफेड"कडे विक्री करणार्या व्यापारी, दलालांच्या चौकशीचे फर्मान सहकारमंत्र्यांनी दिले. यामुळे व्यापार्यांनी कारवाईचा धसका घेत जिल्हय़ातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांकडील तूर खरेदीस "ब्रेक" दिला आहे. परिणामी, शेतकर्यांची हजारो क्विंटल तूर बाजार समितीच्या ओट्यांवर पडून राहत आहे. यामुळे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आर्थिक टंचाईत सापडलेला शेतकरी अधिकच हवालदिल झाला आहे. जिल्हय़ात दरवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. शासनाने "नाफेड"मार्फत वाशिम जिल्ह्यात तूर खरेदी केली. त्यानुसार, मंगरूळपीर येथे विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, तर कारंजा, मालेगाव, वाशिम आणि अनसिंगच्या उपबाजारात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने ५ हजार ५0 रुपये हमीदर ठरवून शेतकर्यांकडून तूर खरेदी केली; मात्र खरेदी सुरू करण्यापूर्वी साठवणूक आणि इतर तांत्रिक मुद्यांचे नियोजन न केल्यामुळे तसेच मध्यंतरी बारदाना टंचाईसह इतर अनेक अडचणी समोर करून तूर खरेदी अधूनमधून खंडित करण्यात आली. शेवटी २२ एप्रिलपर्यंत ज्या शेतकर्यांनी ह्यनाफेडह्णच्या केंद्रावर तूर आणली, त्यांच्याच तुरीची मोजणी करून खरेदी करण्याचे निर्देश शासनाने दिले. असे असले तरी वेळेवर वाहन न मिळणे यासह इतर तत्सम अडचणींमुळे जिल्हय़ातील अनेक शेतकरी २२ एप्रिलपर्यंत तूर बाजार समितीत नेऊ शकले नाहीत. अशा शेतकर्यांची तूर आता नाफेडसोबतच व्यापारीही स्वीकारण्यास तयार नसल्याचे चित्र जिल्हय़ातील सर्वच बाजार समित्यांमध्ये दिसून येत आहे. "नाफेड"कडे प्राप्त शेतकर्यांची तूर मोजायला लागणार आणखी आठ दिवस!शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, २२ एप्रिल २0१७ पर्यंत ह्यनाफेडह्णने शेतकर्यांकडील तूर स्वीकारली; मात्र ५ हजार ५0 रुपये हमीदरानुसार खरेदी केली जाणारी ही तूर तब्बल २ लाख क्विंटलपेक्षा अधिक असून, ती मोजणी करण्यासाठी आणखी किमान आठ दिवस लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. या विलंबामुळे मात्र शेतकर्यांचे आर्थिक नियोजन पूर्णत: कोलमडले असून, त्यांच्यासमोर खरीप हंगामासाठी लागणारे बी-बियाणे, खत खरेदीचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.रिसोडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर २९ डिसेंबर २0१६ ते १ एप्रिल २0१७ या कालावधीत २,६७६ शेतकर्यांकडून हमीदराने ३0 हजार ८५२ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली; मात्र सध्या बारदानाच शिल्लक नसल्याने हजारो क्विंटल तूर मोजणीअभावी तशीच पडून आहे. विशेष बाब म्हणजे यात आमदार अमित झनक यांच्या १00 क्विंटल तुरीचाही समावेश आहे. दरम्यान, शेतकर्यांची तूर तातडीने खरेदी करण्याबाबत खरेदी-विक्री संघाने पाठपुरावा केला.
व्यापारीही स्वीकारेनात शेतक-यांची तूर!
By admin | Published: May 08, 2017 1:42 AM