विविध संकटाचा सामना करीत शेतकºयांना शेती करावी लागत आहे. तळप बु. परिसरात यंदाच्या उन्हाळ्यात शेतकºयांनी भूईमुगाची लागवड केली होती. हवामानातील बदलामुळे काही शेतकºयांच्या शेतातील भुईमुगाला अपेक्षीत शेंगा लागल्या नाहीत. एका एकराला भुईमूग पेरणीचा एकूण खर्च नागरणे, वखरणे, बियाणे, खते, पेरणी, डवरे, फवारणी, काढणे याकरीता २० ते २२ हजार रुपये येतो. काही शेतकºयाला तीन क्विंटलच्या आसपास उत्पादन झाले. प्रती क्विंटल भाव ५५०० ते ५७०० दरम्यान आहे. त्यामुळे १७ ते १८ हजार रुपये उत्पन्न हाती आले. काही शेतकºयांच्या शेतातील भुईमूगाला अपेक्षीत शेंगा लागल्या नाहीत. बंडू इंगोले यांनी एक हेक्टर शेतात भुईमूग लागवड केली होती.मात्र, शेंगा न लागल्यामुळे शेवटी त्यांनी शेतात ट्रॅक्टर फिरविला. नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकट उभे ठाकल्याचे इंगोले यांनी सांगितले.
भुईमुगाला शेंगा नसल्याने शेतकºयाने शेतात फिरविला ट्रॅक्टर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:41 AM