लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बोराळा प्रकल्पातून प्रस्तावित पुलाचे काम विनाविलंब करून अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना न्याय द्यावा, या मागणीसाठी मालेगाव पंचायत समितीचे माजी सभापती रामेश्वर अवचार यांनी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ९ आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.यासंदर्भातील निवेदनात अवचार यांनी नमूद केले आहे, की लघूपाटबंधारे विभागाकडून १९८५ मध्ये बोराळा सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. तेव्हाच्या अंदाजपत्रात या प्रकल्पावर सिमेंट-काँक्रीटचा पूल उभारण्याची बाब प्रस्तावित होती. प्रत्यक्षात मात्र संबंधित विभागाने पुलाचे काम अर्धवट करून आपले हात झटकले. परिणामी, तेव्हापासून आजतागायत बोराळा, खंडाळा शिंदे, वाघी, शेलगाव इंगोले आदी गावांमधील शेतकºयांची दरवर्षी गैरसोय होत आहे. प्रकल्पाच्या दुसºया काठावर अनेकांची शेती वसलेली आहे. मात्र, पक्का रस्ता अथवा पुल नसल्यामुळे शेतकºयांना उन्हाळ्यातच खत, बी-बियाणे यासह अन्य शेतीपयोगी साहित्य शेतात नेऊन ठेवावे लागते. सद्या सोयाबिन काढणीची वेळ असल्याने शेतकºयांना ६ ते ७ फूट पाण्यातून जीवघेणा प्रवास करित शेत गाठावे लागत आहे, असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.यासंदर्भात लघुपाटबंधारेच्या मालेगाव उपविभागातील अधिकाºयांकडे वेळोवेळी पाठपुरावा करून अंदाजपत्रकातील रस्ता व पुल उभारून देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, तेव्हाच्या अंदाजपत्रकातील पुलाची किंमत सद्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सदर बाब शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच असंख्य शेतकºयांना न्याय मिळण्यासाठी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला, असे अवचार यांनी निवेदनात नमूद केले आहे.
बोराळा प्रकल्पातून प्रस्तावित पुल बांधून मिळण्यासाठी उपोषण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 2:47 PM