एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरुळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा जिल्ह्यातील एकूण १६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला होता. दरम्यान, १६३ पैकी ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५ जानेवारी रोजी १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी सरासरी ७५.८६ टक्के मतदान झाले. १२३३ जागांसाठी ३२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून तालुकास्तरीय केंंद्रात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ग्रामपंचायतींच्या वाॅर्ड व सदस्य संख्येनुसार मतमोजणी केंद्रात टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून मतमोजणी केंद्र परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
०००००
तालुकानिहाय मतमोजणी केंद्र
तालुका मतमोजणी ठिकाण
वाशिम कोरोनेशन हॉल, बसस्थानकासमोर
रिसोड तहसील कार्यालय
मालेगाव तहसील कार्यालय
मं.पीर तहसील कार्यालय
कारंजाशासकीय धान्य गोडाऊन
मानोरा औद्योगिक प्रशिक्षण संस्था
०००००
तालुकानिहाय ग्रामपंचायती
तालुकाग्रामपंचायती
वाशिम १९
रिसोड ३२
मालेगाव २८
मं.पीर २५
कारंजा १७
मानोरा २१
एकूण १५२
०००००
कोरोना चाचणीनंतरच मतमोजणी कक्षात प्रवेश
मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधींनादेखील कोरोना चाचणी करण्याच्या सूचना निवडणूक विभागाने दिल्या होत्या. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असलेल्या मतमोजणी प्रतिनिधी व उमेदवारांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.
०००००
जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले. १८ जानेवारी रोजी तालुकास्तरीय मतमोजणी केंद्रात सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधींना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अहवाल निगेटिव्ह असलेल्यांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाईल.
- सुनील विंचनकर,
उपजिल्हाधिकारी (महसूल) वाशिम