- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तालुक्यातील एकदम छोटयाश्या गावात झोपडीत राहणारा स्वताच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत होत असताना केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर १४ मुलांचा त्यातही ते अंध मुलांचा जन्म न देता बाप झाला आहे. त्यांचा पालन पोषणसह शिक्षणाची जबाबादारी तो आवर्जून पार पाडत आहे.अतिशय छोटेस व शहरापासून अतिशय जवळ असलेले केकउमरा येथल पांडुरंग हे आपल्या गावात पत्नी गंगासागर, एक मुलगी चेतना व अंध मुलगा चेतन यांच्या सोबत आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना आपल्या अंध चेतनच्या समस्या पाहून त्यांचे मन हेलावेल. त्यांनी अंध विद्यार्थ्यांना आसरा देण्याचे कार्य हाती घेतले . पाहता पाहता त्यांच्या झोपडीत १४ मुले जमा झालीत यामध्ये दशरथ जोगदंड, कैलास पानबुडे, भरत खांडेकर, विजय खडसे, विकास गाडेकर, अश्विनी पवार, राधिका गाडेकर, अमोल गोडघासे, लक्ष्मी पानबुडे, गजानन खडसे, रुपेश हिरोळकर, मंगेश पुणेकर, रुपाली फुलसावंगे यांचा समावेश आहे. सुरुवातील या सर्व मुलांचा सांभाळ करताना अतिशय कठीण दिवस काढावे लागलेत. आज अंध असताना पांडुरंगाचे ते आधार झाले आहेत. या सर्वांनी आर्केस्टा काढून लग्न समारंभ सामाजिक उपक्रासम शासकीय योजनांचा प्रचार प्रसार करीत आहेत. रक्षा बंधनानितमत्त सर्व अंध मुले राख्या तयार करुन विकताहेत. आधि पैशांची जुळवाजुळव करताना येणारी अडचण त्यांना भासत नाही. अनेक सामाजिक कार्यकर्ते नेहमी त्यांचे कार्य पाहून त्यांच्या मदतीला धावतात. कोरोनाच्या पृष्ठभूमिवर त्यांना अतिशय कठीण परिस्थितीतून बाहेर जावे लागले, परंतु अनेकांनी मदतीचा हात पुढे केल्याने तोही वेळ निघून गेला. अनेक जण त्यांच्या कार्याचे कौतूक करताहेत.‘पेरलं ते उगवतं’ अशी एक मराठीत म्हण आहे. तसेच माझ्या काही बाबतीत घडले .माझ्या मुलापासून प्रेरणा मिळाल्याने ज्यांना कोणी सहारा देत नाही अशा अंध विद्यार्थी, बालक, युवकांना मी वागविण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कठीण प्रसंगातून न खचता व्यवस्था केली. आज तेच सर्व मला कुटुुंब चालवितांना मदत करताहेत.-पांडुरंग उचितकरमाझा मुलगा अंध असतांना त्यांचे दुख पाहून माझ्या पतीने अंध मुलांचा सांभाळ करण्याचा घेतलेला निर्णय आवडला. परंतु सुरुवातीला आमच्या कुटुंबियांसह त्यांचा उदरनिर्वाह करताना होत असलेली कसरत व त्यांचेही होत असलेले हाल पाहवत नव्हते. परंतु निर्णय योग्य असला की वेळही साथ देते. आज आम्ही सर्व खूष आहोत.-गंगासागर उचितकर
Fathers Day : १४ अंधाचे पितृत्व स्वीकारणारा ‘बाप माणूस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:34 AM