ग्रामस्थांनी जपल्या स्मृती : उद्या तुकडोजी महाराजांची जयंतीकारंजा लाड : मानवतेचे महान पुजारी व ग्रामगीतेच्या माध्यमातून सर्वधर्म समभावाची शिकवण देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ६० वर्षांपूर्वी कारंजातील लाडेगावला भेट दिले. त्यांच्या चरणस्पर्शाने लाडेगाव पावण झाले. त्यावेळी राष्ट्रसंतांंनी लोकसहभागासतून या ठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती करून एक प्रेरणा ग्रामस्थांच्या मनात निर्माण केल्याने या गावातील समस्या कायमची मिटली. ३० एप्रिल हा राष्ट्रसंतांचा जयंती दिवस असून, या औचित्यावर समस्त लाडेगाववासियांनी त्यांच्या स्मृती जागविल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सहवास म्हणजे जीवनातील एक अमुल्य ठेवा होय. असे मत गुरुदेवप्रेमींनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज १९५७ मध्ये लाडेगाव येथे आले होते. त्यावेळी गावकऱ्यांच्या सहकार्याने महाराजांनी लोकसहभागातून गावाशेजारी बंधाऱ्याचे बांधकाम केले. हा बंधारा लाडेगाववासियांसाठी प्रेरणादायक ठरला असून, आजही तो त्याची साक्ष देत आहे. स्वावलंबन, सेंद्रीय शेती, परसबाग, खादी कपड्याचा वापर, व्यसनमुक्ती, सामुदायीक प्रार्थना, ध्यान,रामधुन, सर्वधर्म समभाव, ग्रामसफाई गाव तंटामुक्त, स्वच्छता अभियान, ग्रामसभा, लोकसहभागातून गावाचा विकास, सामुहिक विवाह सोहळा, मुलांवर संस्कार आदि विषयाची गावकऱ्यांनी अंमलबजावणी करावी म्हणून राष्ट्रसंतांनी या ठिकाणी एक महिन्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याचे आवाहनही केले आणि गावातील देवराव पाटील सवाई यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण पार पडले. या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला वंदनीय राष्ट्रसंतांनी खुद्द हजेरी लावली होती. प्रशिक्षण वर्गात तालुक्यातील शहा, काजळेश्वर, दिघी, अर्लीमदापूर, यासह असंख्य गावातील गुरुदेव भक्त शिबिरात सहभागी होते. या दरम्यान गाव शेजारी असणाऱ्य बेंबळा नदीला पुर आल्यास गावाला पाण्यापासून धोका होता, मात्र महाराजांनी लोक सहभागातून गावाला लागुन मातीचा बांध बांधण्यास गावकऱ्यांना प्रवृत्त केले व बंधारा बांधला. कधी काळी नदीला पुर आल्यास त्यापासून संरक्षणासाठी हा बांध उपयोगी ठरतो. राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या गावात अजुनही गुरुदेव सेवा मंडळाची शाखा कार्यरत आहे.गावात नित्यनियमाने सर्वधर्मीय सामुदायीक प्रार्थना मंदिरात सकाळी सामुदायिक ध्यान व सायंकाळची प्रार्थना रामधुन हा कार्यक्रम ६० वर्षापासून सुरु आहे.
राष्ट्रसंतांचे चरणस्पर्शाने पावन झालेले ‘लाडेगाव’
By admin | Published: April 29, 2017 2:49 PM