वाशिम: देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाºया वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वाशिम येथील कलाकारांनी २६ जानेवारी रोजी ’एक शाम शहिदो के नाम’ या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वागत लॉनवर होणाºया या कार्यक्रमात जिल्ह्यातील शहिदांच्या कुटुबियांचा शाल, श्रीफ ळ देऊन सत्कारही करण्यात येणार आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी तसेच शहीद जवानांचया वीरगतीला मानवंदना देण्यासाठी म्युझीकल इव्हेंट ग्रूप या कलाकारांच्या समुहाने २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून (एक शाम शहीदो के नाम’ ही देशभक्तीपर गीतांची संगीत मैफिल तसेच देशाच्या सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांची शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोक हेडा राहणार असून, पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, अमित झनक, लखन मलिक, श्रीकांत देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, जि.प. अध्यक्षा हर्षदा देशमुख, लॉयनेस क्लब अध्यक्षा निलिमा चव्हाण, न.प. उपाध्यक्ष रुपेश वाघमारे, माधव मारशेटवार आदिंची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी नसिरुद्दीन शाह, गणेश नकवाल, सुधाकर वानखडे, महेश बारटक्के सय्यद अनिस, संतोष राठोड, सुरेश गायकवाड, वासुदेव कांबळे, राजेश पवार, कैलास गायकवाड, हे कलाकार परीश्रम घेत आहेत.
’एक शाम शहिदो के नाम’ : प्रजासत्ताक दिनी होणार शहीदांच्या कुटुंबियांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:05 PM
वाशिम: देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाºया वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वाशिम येथील कलाकारांनी २६ जानेवारी रोजी ’एक शाम शहिदो के नाम’ या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
ठळक मुद्देम्युझीकल इव्हेंट ग्रूप या कलाकारांच्या समुहाने २६ जानेवारी रोजी शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांची शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्वागत लॉनवर होणाºया या कार्यक्रमात जिल्ह्यातील शहिदांच्या कुटुबियांचा शाल, श्रीफ ळ देऊन सत्कारही करण्यात येणार आहे.