मानोरा : नवऱ्यासह अख्खे कुटूंब दारुच्या आहारी गेल्याने कबाडकष्ट करुन सुध्दा संसार उघड्यावर पडला . दारू विक्रेत्यांना विनंती करुन सुध्दा ते दारु बंद करीत नसल्याने अखेर महिला आक्रमक होवून रस्त्यावर उतरल्यात व दारू गाळणाऱ्यांचे साहित्य, दारू फेकून दिल्याची घटना कारखेडा येथे घडली . तालुक्यातील कारखेडातील महिला अवैध दारु विक्रीमुळे त्रस्त झाले. गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री होत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. लहान मुले दारुच्या आहारी गेले आहे. रोजच्या त्रासाला कंटाळुन शेकडो महिला ग्रामपंचायत कार्यालयावर धडकल्या, तेथे चालु असलेल्या ग्रामसभेत सरपंच व पदाधिकारी यांना धारेवर धरले. गावचे सरपंच भानुदास जाधव यांनी महिलांच्या सन्मान करत बहूमताने दारुबंदीचा ठराव घेतला . महिला एवढ्यावरच न थांबता तातडीने अवैध दारु विक्रेतेच्या घरी जावुन जवळ असलेली दारु दोन दिवसात विका अन्यथा होणाºया परिणामाला तयार रहा असा इशारा दिला . दरम्यान एका दारु विक्रेताने महिलाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करतातच विक्रेत्याच्या घरात असलेली दारु व सडवा माल याची नासधुस करण्यात आली. यावेळी सुरेखा नागेश चव्हाण, सुनिता विनोद राठोड, अन्नपुर्णा बावणे, सुमित्रा किसन ढोके, पार्वती विष्णु जाधव, यशोदा दशरथ राठोड, पुष्पा जाधव, रिना राठोड, वच्छला तुकाराम जाधव, फुली रामहरी राठोउद्व सुमन राठोड, यांच्यासह शेकडो महिला हजर होत्या. उकंडाबाई किसन जाधव, केसर नामदेव राठोड, इंदुबाई रमेश ढोके, बेबीताई उत्तम चव्हाण यांच्यासह नवनियुक्त तंटामुक्त अध्यक्ष प्रदीप मोहन सोळंके, उपसरपंच जयश्री गणेश बावणे, ग्रामसेवक अशोक साठे, ग्रामपंचायत सदस्या उमा किसन चव्हाण, संगीता नारायण राठोड, प्रशांत मनमोहन देशमुख, प्रल्हाद वाघजी शिकारे, आम्रपाली समाधान ढवळे, सुलोचना माणिकराव खेरे, सोसायटी अध्यक्ष भिमराव राऊत, यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.