लोकमत न्यूज नेटवर्कउंबर्डा बाजार (वाशिम): नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील दोनद बु. गावाजवळ रस्त्यावरील मोठ्या खड्डयांमुळे चारचाकी वाहनाला भीषण अपघात होवून नागपूर येथील तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३ डिसेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, खड्डयांमुळे त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी अपघातानंतर रास्तारोको आंदोलन करून रोष व्यक्त केला. यामुळे सदर मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. याबाबत प्राप्त माहितीनुसार, दोनद बु. या गावाजवळ गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडलेला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यास बांधकाम विभागाने जुमानले नाही. अशातच ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास नागपूर येथील एक दाम्पत्य औरंगाबाद येथे कुटूंबासह मारुती सुझूकी सलेरियो या (क्रमांक एमएच ३१ एफ ए ०१६१) वाहनाने जात असताना ते खड्डयात आदळून भीषण अपघात झाला. यात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यासोबतच पती-पत्नीसह एक वृद्ध इसम गंभीररित्या जखमी झाला. जखमींना तातडीने कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
नागपूर-औरंगाबाद महामार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे चारचाकी वाहनाला अपघात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 8:36 PM
नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील दोनद बु. गावाजवळ रस्त्यावरील मोठ्या खड्डयांमुळे चारचाकी वाहनाला भीषण अपघात होवून नागपूर येथील तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३ डिसेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, खड्डयांमुळे त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी अपघातानंतर रास्तारोको आंदोलन करून रोष व्यक्त केला.
ठळक मुद्देअपघातात नागपूर येथील तीनजण गंभीर जखमी दोनद बु. जवळ खड्डयांमुळे झाला अपघात; संतप्त नागरिकांचा रास्तारोको!महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प