पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी रहेनाबी अब्दुल साजीद (वय ४०) यांनी फिर्यादीत असे नमूद केले आहे की, फिर्यादीच्या घरासमोर म्हशीला मारल्याबाबत विचारणा केली असता आरोपीने संगनमत करून फिर्यादीच्या घरात घुसुन लोखंडी पाईप व काठीने मारहाण करून जखमी केले व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या भांडणात फिर्यादीचे पती अ.साजीद व मुले साहील, साबीर, रेहान हे सुध्दा जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले. या तक्रारीवरून अ.साजिद अ. रसिद, अ. राजिद अ.रसिद, शाहनजबी अ. रसिद, असमीन परवीन शेख असार रा. मोखड प्रिप्री यांच्या विरूध्द कलम ३०७, ४५२, ३२३, ५०४, ५३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, तर दुसऱ्या गटातील यासमीन परवीन शेख असार यांनी फिर्याद दिली की, म्हशीच्या झालेल्या वादावरून आरोपी अ. साजिद अ. अजिद, साहील अ. सादिक, साबिर अ. सादिक यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून उपरोक्त आरोपींवर कलम ३२४, ५०४, ५०६ भादंवि ३४ नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक पोलीस गजानन धंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे करीत आहेत.
मोखड पिंप्री येथे दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:57 AM