प्राप्त माहितीनुसार, कारंजा येथे विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटरला १९९० पासून लीजवर जागा देण्यात आली आहे. सदर जागा संस्थेच्या ताब्यात असून, त्यात बेकायदेशीर ले-आउट टाकून आणि मो. युसूत्र पुंजानी यांचा मुलगा बिलाला पुंजानी यांच्या नावे ले-आउटचा पोच रस्ता शहर विकास आराखड्यामध्ये नाही. मो युसूफ पुंजानी यांनी या रस्त्याला बेकायदेशीर डांबरीकरण करून रस्ता तयार केला. याप्रकरणी फिर्यादी डाॅ. सुरेश सावजी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पुंजानी यांच्यावर भादंविचे कलम ४४१ व ४४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
......................
कोट :
कारंजा शहरातील काही राजकारणी मंडळी अत्यंत खालच्या पातळीला उतरले असून, राजकीय आकसापोटी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यास इतरांना प्रवृत्त करीत आहेत. ज्या रस्त्याच्या कामाबाबत माझा कोणताही संबंध नाही, त्याप्रकरणी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील शांतीनगर, लक्ष्मीनगर, रमाई नगर आदी भागातील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन लोकवर्गणीतून सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी मी न्यायालयात दाद मागणार आहे.
- मो.युसूफ पुंजानी, कारंजा लाड.