लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: कारंजा येथील भारतीय स्टेट बँकेतील महीला कर्मचाऱ्यावर फसवणूक प्रकरणी शुक्रवारी पोलिीसांनी गुन्हा दाखल केला.
प्रमिला जानराव गांवडे (४५)मुर्तीजापूर जि. अकोला ही महीला कारंजा बँकेत कार्यरत असताना पदाचा गैरवार करून बॅकेतील ३८ हजार रूपयाची अफरातफर ९ डिसेंबर २९१५ रोजी केली. या प्रकरणी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक सुभापचंद्र सुरेचंद्र मोहनवी यांनी दिलेल्या फियार्दीवरून कलम ४०६/४०८/४०९/४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.