मानोरा पोलिसांत पीडित मुलीने २ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीनुसार मानोरा येथे बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट घेण्याकरिता मैत्रिणीबरोबर गेली असता मानाेरा बसस्थानकावर आरोपीने जबरदस्तीने मोबाईल हिसकावून ट्रॅव्हल्समध्ये बसविले व अकोला येथे नेले. तेथून सायंकाळी शेगाव येथे नेऊन २९ जून रोजी जबरदस्तीने अतिप्रसंग केला. त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता जीवे मारण्याची धमकी दिली. ३० जून रोजी मंगरुळपीर येथे पीडितेस साेडून दिले. पीडितीने तेव्हा आपल्या मामास फाेन करून बाेलाविले व सर्व हकिकत सांगितली. पीडितेची तब्येत ठीक नसल्याने २ जुलै रोजी यासंदर्भात मानाेरा पाेलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार देण्यात आली. या तक्रारीवरून आरोपी सतीश अनिल राठोड (रा. दापुरा) याचे विरूद्ध मानोरा पोलिसांनी कलम ३७६, ३६६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शिशिर मानकर यांच्या मार्गदर्शनात मानोरा पोलीस करीत आहेत.
अतिप्रसंग केल्याच्या तक्रारीवरून आराेपीविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:27 AM