लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : फेसबुकवर महिलेच्या नावे अकाउंट सुरू करून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पोलिसांनी कारंजा येथील गगन रमेश रॉय याच्याविरूद्ध ४ जुलैला माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. विठ्ठल-रुख्माई नगरात राहणाऱ्या महिलेने पोलिसात तक्रार दिली की, आरोपी रॉय याने तीचे फेसबुक अकाउंट हॅक करून नवे अकाउंट तयार केले व त्यात इतर मित्र-मैत्रीणींना सामावून घेत माझ्या नावे संवाद साधला. अशा तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुध्द सायबर क्राईम कायद्यान्वये कलम ४३ अ, ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला आहे.
महिलेच्या नावे फेसबुक अकाऊंट सुरू करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल!
By admin | Published: July 04, 2017 7:43 PM