- सुनील काकडेवाशिम - नागपूर ते मुंबई सुपर एक्सप्रेस वे अर्थात समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. १,०९३ हेक्टर संपादित करण्यात आली असून, त्यापोटी संबंधित १ हजार ९९७ शेतकऱ्यांना ३८४.५२ कोटी रुपयांचा मोबदलादेखील वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी तथा प्रशासक सुनील माळी यांनी सोमवारी दिली.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्याातील कारंजा लाड, मंगरूळपीर, मालेगाव आणि रिसोड या चार तालुक्यांतील ५४ गावांमधून एकंदरीत १ हजार ४०९ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात वनविभागाच्या मालकीची १३४ हेक्टर आणि शासकीय मालकीची ७० हेक्टर जमीन असून उर्वरित जमीन शेतकºयांच्या मालकीची आहे. दरम्यान, सुपीक जमिनी देण्यास मध्यंतरी काही शेतकºयांमधून प्रखर विरोध दर्शविण्यात आल्याने भूसंपादनाची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. यादरम्यान रेडी रेकनर दराच्या पाचपट मोबदला देण्याची तयारी शासनाने दर्शवून शेतकºयांना समृद्धी महामार्गासाठी जमिनी देण्याचे आवाहन केले. त्यानुसार, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत २३ जुलै २०१७ रोजी कारंजा येथून ‘अल्फाबेटीकल’ पद्धतीनुसार शेतकºयांकडून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत (११ जून पर्यंत) अपेक्षित १,४०९ हेक्टरपैकी शेतकºयांची ८६४ हेक्टर व शासकीय २२९ हेक्टर अशी एकूण १,०९३ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.
‘समृद्धी’चे भूसंपादन अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 6:47 AM